मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत विचित्र तापाची साथ आली असून या 'डोंबिवली फीवर- २'च्या लक्षणांमुळे येथील डॉक्टरही हैराण झाले आहेत. हा ताप एकदा आल्यानंतर दहा ते बारा दिवस कमी होत नाही. उपचार केल्यानंतर काही काळासाठी ताप उतरतो; पण पुन्हा त्यात चढउतार होत राहतात. रुग्णाला सलग दहा ते बारा दिवस ताप येत असल्याने आणि सर्व प्रकारचा औषधोपचार करूनही तो ताप कायमचा जात नसल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या तापाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.
विविध प्रकारचे जंतू, वातावरणातील बदलामुळे हा ताप येतो. हा ताप प्रसंगी मलेरिया, टायफॉइडवरही जाऊ शकतो. मिक्स व्हायरल प्रकारचा हा ताप असल्याने या तापाच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या तरी त्यामधून काहीही निष्पन्न होत नाही. अशा प्रकारच्या तापाचे निदान डॉक्टरांना होत नाही, असे पालिकेतील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
याबाबत पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांनी सांगितले की, आतापर्यंत अशा प्रकारच्या तापाची तक्रार आपणाकडे आलेली नाही. असे काही असेल, तर आपण शनिवारी डॉक्टरांची बैठक घेऊ.
साथीच्या आजारांची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन याबाबत तपासणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















