दिवसेंदिवस स्वाइन फ्लूच्या रुग्णांध्ये वाढ होताना दिसत असल्याचे सध्या चित्र आहे. बॉलीवूड दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा हेदेखील सदर आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यासह त्याची पत्नी अनुपमा आणि मुलगा अग्नी यांनाही स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.
अनुपमा यांनी ट्विटरवरुन त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती दिली. अनुपमा यांनी ट्विट केले, “मित्रांनो, मला स्वाइन फ्लू झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात रिव्ह्यू नाही. तुम्ही मला तुमचे रिव्ह्यू पाठवा आणि सांगा, मी काय मिस केले.” मुंबईतील जसलोक रुग्णालयात विधू आणि त्यांच्या मुलावर उपचार सुरु असून अनुपमा या घरीच आहेत. सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार, विधू आणि त्यांच्या मुलांच्या तब्येतीत सुधारणा येत असून त्यांना रविवारपर्यंत डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो.