शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या वक्त्याकडून वक्तृत्वाची बाराखडी शिकण्याची संधी येत्या शनिवारी सर्वानाच उपलब्ध होणार आहे. निमित्त आहे अर्थातच ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे.
वक्तृत्व म्हणजे नुसते बोलण्याचे काम नाही. ती कला आहे आणि शास्त्रही. त्याची स्वत:ची अशी एक शैली आहे. इच्छुकांना ती शिकता येणार आहे. राज्यभरातील आठ विभागांत प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पार पडल्यानंतर आता ‘लोकसत्ता’ आयोजित वक्तृत्व स्पध्रेची महाअंतिम फेरी येत्या शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी विलेपाल्रे येथील लोकमान्य सेवा संघात पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्या अमोघ वाणीने महाराष्ट्रात आणि भारतातच नाही, तर परदेशातही पोहोचवणारे, शिवचरित्रावर हजाराहून अधिक कार्यक्रम करणारे शिवशाहीर पुरंदरे महाअंतिम फेरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 स्पध्रेदरम्यान बाबासाहेबही स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाअंतिम फेरीत आठ केंद्रांवरील नऊ वक्ते आपापल्या विषयांची मांडणी करतील. रुईया महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यभार सांभाळणारे आणि वक्तृत्वापासून नाटकांपर्यंत सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांत मोलाची कामगिरी बजावणारे विजय तापस आणि ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे मान्यवर परीक्षक त्यातून महाराष्ट्राच ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ निवडणार आहेत. ‘नाथे समूह’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफाइस’ व भारतीय आयुर्वमिा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा’ या राज्यस्तरीय स्पध्रेत राज्यभरातील २५० शेहून अधिक महाविद्यालयांतील ५००हून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता. या स्पध्रेला ‘जनकल्याण सहकारी बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ यांचीही मदत लाभली आहे.