अभिनेत्री राधिका आपटे हिच्या आगामी लघुपटातील एक क्लिप सोशल मिडियावर उघड झाल्याप्रकरणी सायबर सेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधिका ही कश्यप यांच्या एका आंतरराष्ट्रीय लघुपटात काम करत आहे. हा लघुपट प्रदर्शित होण्याआधीच त्यातील राधिकाचे एक वादग्रस्त दृश्य असलेली क्लिप सोशल मिडियावर ॅउघड (व्हायरल) झाली आहे. लघुपटावर तांत्रिक काम करत असताना स्टुडियोतून ती ‘लिक’ झाली असावी अशी शक्यता आहे. या विरोधात कश्यप यांनी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सायबर सेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.