मुंबईतील गोवंडी भीमवाडी झोपडपट्टी परिसरातील आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आज सकाळी चार वाजताच्या सुमारास गोवंडी भीमवाडी परिसरात आग लागली होती. या परिसरात अनेक झोपड्या आहेत.
गोवंडी भीमवाडी झोपडपट्टीला आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या आणि आठ वॉटर टॅंकर्स घटनास्थळी रवाना झाले होते. या भागात झोपड्या असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या आत जाण्यात अडथळा निर्माण होत होता. तसेच, अनेक घरे असल्याने येथे घरगुती सिलेंडरमुळे आगीचा भडका अधिक वाढला होता. पण आता आग आटोक्यात आली आहे, असे अग्निशमन अधिका-याने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचे समजते.
दरम्यान, ही आग सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग