दादर येथील एका इमारतीला नियमबाह्य़ परवानगी दिल्याने अग्निशमन दलाचे उपप्रमुख  अधिकारी शशिकांत काळे यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. त्यांना यापूर्वीही एका प्रकरणात निलंबित करण्यात आले होते, मात्र चौकशीनंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.
शशिकांत काळे यांच्याकडे पूर्व उपनगराच्या अग्निशमन सेवेची जबाबदारी आहे. मात्र दादर विभागाचे अधिकारी रजेवर गेल्याने काळे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता. या काळात त्यांनी दादरमधील एका इमारतीला नियमबाह्य़ पद्धतीने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिल्याचा
आरोप आहे.
पूर्वीच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यास नकार दिलेला असतानाही काळे यांनी प्रमाणपत्र दिल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.