30 May 2016

उपनगरी गाडीचा ट्रान्स्फार्मर फुटून उडालेल्या तेलाने ११ प्रवासी होरपळले

अंधेरीहून हार्बर मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येत असलेल्या उपनगरी गाडीच्या दुसऱ्या डब्याखाली असलेल्या ट्रान्सफार्मरचा

मुंबई | December 4, 2012 12:16 PM

अंधेरीहून हार्बर मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येत असलेल्या उपनगरी गाडीच्या दुसऱ्या डब्याखाली असलेल्या ट्रान्सफार्मरचा स्फोट होऊन त्यातील गरम तेल अंगावर उडाल्याने ११ जण होरपळले. मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या दुर्घटनेत होरपळलेल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे.  अंधेरीहून सीएसटीकडे येणा-या लोकलने ‘रे रोड’ स्थानक सोडल्यानंतर ही आग लागली. अंधेरीच्या दिशेला असणा-या डब्यांपैकी गार्डच्या आणि गार्डच्या पुढच्या डब्याला ही आग लागली असून सध्या दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

First Published on December 4, 2012 12:16 pm

Web Title: fire in mumbai local at dockyard road stn