नागपाडामधील पोलिस स्टेशन जवळ असणाऱ्या टायरच्या गोडाऊनला शुक्रवारी दुपारच्या दरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. आगीची तीव्रता अथवा आगीचे कारण अद्याप समजले नसून  या आगीमध्ये आर्थिक किंवा जीवित हानी झाल्याचे वृत्तही मिळालेले नाही.