झी मराठी वाहिनीवरील ‘झी गौरव’ पुरस्कारांसाठी यंदा पाच मालिकांमध्ये चुरस आहे. ‘जय मल्हार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘का रे दुरावा’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ यांच्यात स्पर्धा होणार आहे. तर ‘कथाबाह्य़’ विभागासठी तीन कार्यक्रमांना नामांकन मिळाले आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ही नामांकने जाहीर करण्यात आली. ‘कथाबाह्य़’ कार्यक्रमासाठी ‘होम मिनिस्टर’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘चला हवा येऊ द्या’ यांचा समावेश आहे. याखेरीज ‘सवरेत्कृष्ट नायक’ म्हणून ‘खंडोबा’, ‘नील जहागीरदार’, ‘श्रीरंग गोखले’, ‘जयराम खानोलकर’ यांना तर ‘सवरेत्कृष्ट नायिका’ म्हणून ‘म्हाळसा’, ‘बानू’, ‘स्वानंदी’, ‘जान्हवी’, ‘आदिती’, ‘अस्मिता’ यांना नामांकने जाहीर झाली आहेत.

सवरेत्कृष्ट नायक-नायिका, सवरेत्कृष्ट जोडी, सवरेत्कृष्ट कुटुंब, भावंडे, सासू-सासरे, आई-वडील, खलनायिका, शीर्षकगीत, सूत्रसंचालक या व अन्य विभागांतही पारितोषिके दिली जाणार आहेत. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील कैवल्य आणि आशुतोष करणार असून या सोहळ्याचे प्रसारण १ नोव्हेंबर रोजी ‘झी मराठी’ वाहिनीवरून केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील २० शहरांतून ७२ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या ठिकाणी पन्नास हजारांहून अधिक प्रेक्षकांनी मतदान केले. याबरोबरच फ्री मिस्ड कॉल, लघुसंदेश आणि ऑनलाइन आदी माध्यमांद्वारेही पाच लाखांहून अधिक प्रेक्षकांनी मतदान केले होते.