कॉंग्रेसचे माजी नगरसेवक समीर देसाई यांचा मुलगा चालवत असलेल्या भरधाव गाडीखाली सापडून मुंबईमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. गोरेगावमधील हायपरसिटी मॉलजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी रौनक देसाई याला अटक केली आहे.
मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव लाडो गुप्ता असे आहे. रौनक देसाई भरधाव वेगाने आपली गाडी चालवत होते. याच गाडीखाली चिरडून लाडो गुप्ता हिचा मृत्यू झाला. रौनक मद्यप्राशन करून गाडी चालवत होते का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली असून, त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. कॉंग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे देसाई कुटुंबीय नातलग आहेत.