सतत रडतरखडत चालणाऱ्या, प्रवाशांना कायमच गृहीत धरणाऱ्या मध्य रेल्वेला नवीन वर्षांच्या दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी प्रवाशांच्या हिंसक आंदोलनाला सामोरे जावे लागले. ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळ पेंटोग्राफमध्ये झालेला बिघाड व त्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा हे या उद्रेकाचे निमित्त ठरले. एरवी ऐन गर्दीच्या वेळीही मध्य रेल्वेची मरगळलेली सेवा गोड मानून घेणाऱ्या प्रवाशांच्या संयमाचा बांध अखेर फुटलाच. संतप्त प्रवाशांनी डोंबिवली व दिवा स्थानकांवरील १३ एटीव्हीएम यंत्रांसह तिकीट खिडक्यांची नासधूस केली. पोलीस आणि खासगी वाहनेही आंदोलकांच्या तडाख्यातून सुटली नाहीत. या आंदोलनामुळे तब्बल सहा तास मुंबईची जीवनवाहिनी ठप्प होती. रात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच होते.  
अग्रलेख : एक ‘दिवा’ भडकला..’