मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
* डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आवाहन
* साहित्य संमेलनाचे सूप वाजले
यापुढील काळात साहित्य संमेलनामध्ये धार्मिक प्रतीके वापरली जाऊ नयेत, यासाठी साहित्य महामंडळाने काळजी घेण्याची गरज आहे. तसेच येथील सांस्कृतिक प्रतीकांचाही नीट अभ्यास झाला पाहिजे. त्यातून उद्भवलेला सांस्कृतिक संघर्ष समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी रविवारी त्यांच्या समारोपाच्या भाषणात केले. परशूरामाच्या छायाचित्राच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले.
समारोप सोहोळ्यास हजारो रसिकांची असलेली उपस्थिती आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची अनुपस्थिती हे या समारोपाचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
साहित्यिकाने भूमिका घेतली पाहिजे, या माझ्या प्रतिपादनाचा विपर्यास करून त्यावर टीका करण्यात आली, असे स्पष्टीकरण देऊन डॉ. कोत्तापल्ले म्हणाले की, समाजात समतेचा, बंधुतेचा प्रवाह निर्माण होईल, अशा भूमिकेतून साहित्यिकाने लिहिले पाहिजे, असे मला सुचवायचे होते, पण अध्यक्षीय भाषणात वेळेअभावी मला ते नीट मांडता आले नाही, पण सामान्य माणसाचा अक्षरांवरील विश्वास उडेल, असे कोणी लिहू नये, अशी माझी विनंती आहे.
नाना जोशींचे समर्थन आणि आव्हान
या संमेलनात परशुरामाचा विषय समारोपातही गाजला. माजी आमदार निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांनी या कार्यक्रमामध्ये हा वाद केवळ पुन्हा उकरून काढला, एवढेच नव्हे तर त्याचे नि:संदिग्ध समर्थन केले, तसेच त्यासाठी संघर्षांचेही आव्हान दिले, तसेच समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी 'परशुराम पदस्पर्शे पावन झाली या जगती जय कोकणची धरती' हे गीत स्थानिक कलाकारांनी सादर केले.
लेखकाने धमकी देणे दु:खदायक
'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी काळे फासण्याची धमकी दिल्याचा त्यांचे नाव न घेता उल्लेख करून डॉ. कोत्तापल्ले म्हणाले की, एका लेखकाने दुसऱ्या लेखकाला धमकी देणे अतिशय दु:खदायक आहे. मी कधी पुढाऱ्यांच्या मागे फिरलो नाही. राजकीय पक्षाच्या आधाराने शिक्षणसंस्था काढल्या नाहीत. एकीकडे स्वत:ला अॅण्टीएस्टॅब्लिशमेंटवादी म्हणायचे आणि दुसरीकडे पद्मश्री मिळविण्यासाठी खटपट करायची असेही केले नाही, पण मी लवकरच त्यांच्या साताऱ्याला जाणार आहे. त्या वेळी मला अवश्य काळे फासावे. माझी तयारी आहे.
विविध प्रकारच्या सामाजिक प्रवाहांना सामावून घेणाऱ्या शाश्वत मानवी मूल्यांची रुजवात साहित्याद्वारे होण्याची गरज येथे आयोजित ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.गेले तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे झाला.




















समाजात समतेचा बंधुतेचा प्रवाह निर्माण होईल अशा भुमिकेतून साहित्यिकांनी लिहिले पाहिजे म्हणजे गरोदर स्त्रीला सांगायचे की गोर्या गोमट्या मुलालाच जन्म दे असे सांगण्या सारखे आहे..लेखक असे काहीतरी लिहितात के ते सामान्य माणसाला वाचवत नाही .अक्षरावरिल विश्वास केव्हांच उडाला आहे.संमेलनात परशुरामाचा विषय समारोपात गाजवला या बद्दल श्री नाना जोशी यांचे अभिनंदन. अधिवेशन उधळुन लावायची धमकी हे एक प्रकारचे अरिष्ट असून ते महाराष्ट्रात येणार्या वाईट प्रसंगांची छाया दर्शवते..उदहरणार्थ अखिल महाराष्ट्राला व भारताला पुनीत करणारे आळदीच्या कुलकर्णी या ब्राह्मण कुटुंबात निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी जन्म घेतला आहे. पुढिल वर्षापासून आळंदीहून निघणारी व पंढरपूरला जाणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा उधळून लावायचा अविचार करण्यास , ही ब्राह्मण द्वेष्टे उग्र मंडळी, मागे पुढे पाहणार नाहीत असे समजते. पंढरीराया विठ्ठला यांना सद्बुद्धि आणि सद्गती दे ही अनन्य आगतिक प्रार्थना.