मुंबईमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पीडित तरुणीने शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी पोलीसांनी तपास करण्यास सुरुवात केली.
घाटकोपरमध्ये राहणारी ही तरुणी ९ सप्टेंबर रोजी रात्री सूरतहून वांद्रे टर्मिनस येथे रेल्वेने आली. तेथून घरी जाण्यासाठी तिने एक रिक्षा केली. रिक्षाचालकाने घाटकोपरकडे जाण्याऐवजी नालासोपाऱयाच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मागून आलेल्या तरुणांनी दमदाटी करून रिक्षा अडवली आणि रिक्षाचालकाला त्यातून हुसकून लावले. यानंतर त्यांनी तरुणीला रिक्षातून अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलीसांनी दिली. पोलीसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस संबंधित रिक्षाचालकाचाही शोध घेत आहेत.