‘माय नेम इज अबू सालेम’ या आपल्या जीवनावर आधारित एका पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी कुख्यात गुंड आणि १९९३ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी अबू सालेम याने मंगळवारी अर्जाद्वारे विशेष ‘टाडा’ न्यायालयाकडे केली. विशेष ‘टाडा’ न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांनी सालेमला या पुस्तकाविषयी विचारणा केली असता आपण कुणाशीही बोललो नसल्याचे  सांगितले. संबंधित पत्रकाराने आपल्यावर दाखल केलेल्या आरोपपत्र व अन्य पुराव्यांच्या आधारे जीवनावर आधारित हे पुस्तक लिहिले असावे, असा दावाही सालेमने या वेळी केला. दरम्यान, खटल्याचे कामकाज सुरू असताना अशाप्रकारे आरोपीच्या जीवनावर पुस्तक कसे काय लिहिले जाऊ शकते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले.