मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने राज्य शासनातर्फे सोमवार, २७ फेब्रुवारी या दिवशी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठीचा जागर केला जाणार आहे.

विविध साहित्य प्रकारांसाठी असलेले ३३ राज्य वाङ्मय पुरस्कार तसेच विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना, श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनाला, भाषा अभ्यासक पुरस्कार यास्मिन शेख यांना आणि भाषा संवर्धक पुरस्कार श्याम जोशी यांना वितरित केले जाणार आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ११ पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी होणार असून विश्वकोश मंडळाच्या वतीने ‘पेनड्राइव्ह’मधील विश्वकोशाचे लोकार्पणही होणार आहे. यावेळी प्रसिद्ध पाश्र्वगायक शंकर महादेवन यांच्यासह अन्य कलाकारांचा ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी’ हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Mumbai Port Trust Bharti 2024 Marathi News
Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता अन् वेतन
Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा