वाशी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या महावितरणच्या वीज उपकेंद्राजवळील दुपारी दोनच्या सुमारास  एका २० वर्षीय तरुणी गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आली. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी हा प्रकार पाहिल्यावर पोलीस कंट्रोल रुमला या घटनेची माहिती दिली.
खाडीनजीक असलेल्या खारफुटीत असलेल्या एका झाडाला या तरुणीने ओढणीच्या साह्य़ाने गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.