गिरगाव चौपाटी येथे सोमवारी संध्याकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका इनोव्हा गाडीने धडक दिल्याने एका २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. 

मुंबई सेंट्रलला राहणारी कोमल उर्फ ज्योती सिंग (२५) ही तरुणी कुलाब्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी लज्जा शहा ही डॉक्टरच्या टोयाटा इनोव्हा गाडीने सिंग याच्या मोटारसायकलीला धडक दिली. डॉ शहा यांनी जखमी ज्योतीला आपल्या चर्नी रोड येथील रुग्णालयात नेले. नंतर भाटिया रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.