काळा पैशानंतर मोदी सरकाने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण मोदींसाठी नवी मुंबईतील गोल्डमॅन अर्थात जगदीश गायकवाड यांनी चक्क सुवर्णत्याग केला आहे. मोदींच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी मी सोने घालणार नाही अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे.

पनवेलमध्ये राहणारे जगदीश गायकवाड हे नवी मुंबईतील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. गायकवाड यांच्या अंगावर सुमारे तीन ते चार किलो सोने असते अशी चर्चा नेहमीच केली जाते. पण आता गायकवाड यांनी मोदींसाठी सोन्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातील बँकांमध्ये लाखो कोटी रुपये जमा झाले. आता त्यांनी सोन्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परदेशातून आयात होणा-या सोन्याचे प्रमाण कमी होईल आणि पैशांचीही बचत होईल असे गायकवाड सांगतात. सरकारच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठीच मी आता सोन्याचा त्याग केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांपासून गायकवाड हे सोने घालत होते. सोन्याचा त्याग करुन गायकवाड थांबलेले नाही. याऊलट त्यांनी स्वतःकडील सोने आता दान करण्याचा निर्णयही घेतला आहे. माझ्या जवळील सोने मी गावातील मंदिरात दान केले असून उर्वरित सोने नातेवाईक आणि वारसदारांमध्ये वाटणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

सोने खरेदी करून काळा पैसा पांढरा केल्याचा दाट संशय असल्याने मोदी सरकारने सोन्यावरच लक्ष्यभेद केला होता. सरकारच्या नवीन नियमानुसार विवाहित महिलांना ५० तोळे सोने बाळगता येणार आहे. तर अविवाहित महिलांना २५ तोळे, तर पुरुषांना केवळ १० तोळे सोने बाळगता येणार आहे. त्यापेक्षा जास्त सोने आढळल्यास आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.