गुगलने आपल्या हँगआऊट या आधुनिक चॅटसेवेचा सर्वानी वापर करावा, या उद्देशाने १६ फेब्रुवारीपासून जुनी चॅटसेवा जीटॉक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी कुणी अजूनपर्यंत हँगआऊटचा पर्याय स्वीकारला नसेल, त्यांना तो स्वीकारण्यास आता भाग पडणार आहे. 

गुगलने जीटॉक ही चॅटिंग सेवा बंद करण्याची प्रक्रिया कधीच सुरू केली आहे. गुगलने मागच्या वर्षी अचानक हँगआऊट ही आधुनिक सेवा सुरू केली, पण अनेक वापरकर्त्यांना ही सेवा खूप गोंधळून टाकणारी वाटली. मग ज्यावेळेस वापरकर्ते पुन्हा जीटॉक डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर जात त्यावेळेस डाऊनलोडिंगसाठी थेट हँगआऊटच उपलब्ध होत असे. पण आता गुगलने १६ फेब्रुवारीपासून जीटॉक बंद होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता ज्या वापरकर्त्यांनी अद्याप हँगआऊट सुरू केले नाही, त्यांना ते सुरू करणे भाग पडणार आहे.