वेरावली टेकडी जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून सहा ठिकाणी होत असलेली गळती थांबवण्यासाठी आरे वसाहतीत दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, २० जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गोरेगाव, जोगेश्वरी व अंधेरी परिसरात २० टक्के पाणीकपात केली जाईल.
पाणीकपात नेमकी कुठे? 
बिम्बिसारनगर, वनराई, महानंदा, बांद्रेकरवाडी, सोमानी ग्राम, राममंदिर मार्ग, एस.आर.पी. कॅम्प – गोरेगाव येथे मंगळवारपासून पाणीकपात करण्यात येईल, तसेच, बांद्रेकरवाडी, आजगावकर प्लॉट, सुभाषनगर, वांद्रे प्लॉट, हरीनगर, शंकरवाडी, हेमा इंडस्ट्रियल एरिया, िहदू फ्रेंड्स सोसायटी मार्ग, गुंफा मार्ग, जोगेश्वरी (पूर्व), मालपा डोंगरी, प्रकाशवाडी, गोिवदवाडी, गुंदवली हिल, पारसी पंचायत रस्ता, आंबेवाडी, मोगरा, जुना नागरदास मार्ग, अंधेरी (पूर्व), बेहरामबाग, विकासनगर, क्रांतीनगर, शक्तीनगर, स्काऊट कॅम्प रस्ता, आनंदनगर, पाटलीपुत्र, काजूपाडा, गणेशनगर, हरियाना वस्ती, सुलताना बाग, प्रथमेश संकुल, सहकार मार्ग, यादवनगर, बांदिवली हिल, कॅप्टन सुरेश सावंत मार्ग, अक्सा मशीद मार्ग, शास्त्रीनगर, अग्रवाल इस्टेट, एस. व्ही. मार्ग, गुलशननगर व अमृतनगर जोगेश्वरी