महिलांवरील अत्याचाराबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करण्यासाठी शहरात स्वतंत्र महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. अशाच प्रकारचे कक्ष राज्यातील पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यातही सुरू करण्यात येणार आहेत.गुन्हे शाखेचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या कक्षाच्या प्रमुखपदी उपायुक्त दर्जाचा अधिकारी असेल. त्याचबरोबर साहाय्यक आयुक्त, दोन निरीक्षक, १२ साहाय्यक निरीक्षकांसह आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली.