वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी जाहीर केली. नागपूरच्या पालकमंत्रीपदी नितीन राऊत, यवतमाळच्या पालकमंत्रीपदी शिवाजीराव मोघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांची भंडाऱयाच्या तर रणजित कांबळे यांची वर्ध्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.