शिवसेनाप्रमुखांनी जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत ‘जैसे थे’ असून, त्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

विशेष प्रतिनिधी , मुंबई | November 12, 2012 02:31 am

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत ‘जैसे थे’ असून, त्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली.
गेले काही दिवस शिवसेनाप्रमुखांची तब्येत नाजूक असून, उलटसुलट चर्चा होत आहे. त्यांच्या तब्येतीत शनिवारपेक्षा रविवारी सुधारणा असून काळजीचे कोणतेही कारण नाही, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची चौकशी केली आणि ती ‘जैसे थे’ असल्याचे सांगितले.   

First Published on November 12, 2012 2:31 am

Web Title: happy diwali from bal thackeray
टॅग: Bal-thackeray