मुंबईतील आरे कॉलनीमध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. आरे रॉयल पाम सोसायटीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. या अपघातात विमानातील चार जण जखमी झाले. यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

रॉबिन्सन आर ४४ हे हेलिकॉप्टर गोरेगावमधील आरे कॉलनी भागात कोसळले. यानंतर या हेलिकॉप्टरने पेट घेतला. अपघातातील जखमींना उपचारांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रॉबिन्सन आर ४४ हेलिकॉप्टर आधी पवन हंसच्या ताफ्यात होते. यानंतर एका खासगी कंपनीला या हेलिकॉप्टरची विक्री करण्यात आली. यानंतर या विमानाचा वापर खासगी उड्डाणासाठी करण्यात येत होता. क्लचमध्ये बिघाड झाल्याने एमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न फसल्याने हा अपघात झाला.