मेळघाटात गेल्या पाच महिन्यांत  कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १५०च्या आसपास असल्याची बाब गुरुवारच्या सुनावणीत उघडकीस आली. यामागे कुपोषण हे एकमेव कारण नाही. तर मलेरियाची औषधे वेळेत उपलब्ध न झाल्यानेही बरेच मृत्यू झाल्याची बाबही समोर आली. सरकारी आरोग्य केंद्रांवर औषधे उपलब्ध नाहीत ही बाब खपवूनच घेतली जाणार नाही, असे फटकारत  कुपोषणाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी काय केले याचा तेथील प्रकल्प अधिकाऱ्याने पुढील सुनावणीच्या वेळी खुलासा करावा, असे आदेश न्यायालायने दिले आहेत.