संघाने आपल्या स्थापनेपासूनच्या गणवेशाचा भाग असलेल्या अर्ध्या पायघोळ तुमानींच्या जागी पूर्ण विजारी चढवायचा निर्णय घेतला आहे. संघाचे संस्थापक दिवगंत के. ब. हेडगेवार यांनी १९२४ साली तत्कालीन काँग्रेस सेवा दलाकडून ही अर्धी तुमान उसनी घेतली. इतकी वर्षे ती तशीच राहिली. गंमत म्हणजे काँग्रेस सेवा दलाने आपल्या गणवेशातल्या या अर्ध्या तुमानीच्या जागी पूर्ण विजार केली. पण संघास मात्र ती सोडवत नव्हती. अखेर आता तिच्या जागी स्वयंसेवक पूर्ण विजारी घालतील. हल्लीच्या काळात पूर्ण पँट हा नियमित पेहेरावाचा भाग आहे. त्यामुळे गणवेशात करण्यात आलेला बदल हा काळानुरूप असल्याचं सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचं म्हणणं आहे.

खाकी रंगाची हाफ पँट, त्यावर पांढऱ्या रंगाचा सदरा, डोक्यावर काळी टोपी, कमरेला पट्टा, पायात बूट आणि हातात दंडुका.. अशा वेशातील रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आता यापुढे संघ शाखेवर खाकी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाच्या पूर्ण पँटमध्ये दिसणार आहे. बाकी गणवेशात मात्र बदल करण्यात आलेला नाही. तपकिरी रंगाचीच पँट का, याला काही विशिष्ट कारण नसून या रंगाची पँट सहज उपलब्ध असते आणि दिसायलाही आकर्षक असते, असं संघाचं म्हणणं आहे.

Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Big blow to Sunrisers Hyderabad team in IPL 2024
IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

अगदी सुरुवातीला खाकी हाफपँट, खाकी शर्ट, बूट, खाकी पटिस (पट्टय़ा), पुंगळी, लाल पट्टा, काळी टोपी व दंड, असा गणवेश होता. १९४० साली पहिल्यांदा झालेल्या बदलात पँट व शर्ट हे दोन्ही बदलून खाकी हाफपँट, पांढरा सुती शर्ट, बूट, खाकी पटिस, पुंगळी, ब्राऊन रंगाचा चामडी पट्टा, काळी टोपी व दंड हा गणवेश झाला. १९७७ साली दुसऱ्यांदा झालेला बदल फक्त बुटांचा होता. त्यानंतर आतापर्यंत खाकी हाफपँट, पांढरा शर्ट (सुती किंवा टेरिकॉट), साधे काळे बूट, खाकी मोजे, ब्राऊन चामडी पट्टा, काळी टोपी व दंड, असा संघ स्वयंसेवकांचा गणवेश आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा झालेला बदल हाफपँटवर घालण्याच्या पट्टय़ापुरता (बेल्ट) मर्यादित होता.

संघाच्या मुख्यालयात नव्या गणवेशांची विक्री करण्यात येत आहे. यामध्ये २० ते २४ इतक्या कंबरेच्या मापाच्या ट्राऊझर पँटसाठी २५० रूपये, तर त्यानंतर प्रत्येक वाढीव दोन इंच मापाच्या पँटसाठी अतिरिक्त १० रूपये भरावे लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार संघाने १० हजार गणवेश बनविण्याची ऑर्डर दिली होती. तसेच संघाच्या स्वयंसेवकांना बाहेरून पँट शिवून न घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. संघाकडूनच सर्व स्वयंसेवकांना गणवेश देण्यात येणार असल्याची माहिती संघातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.