मुंबई :  रेल्वेच्या ४५ हजार चौरस मीटर जागेवर असलेली अतिक्रमणे हटवून त्या जमिनींचा विकास करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे यंदाच्या वर्षांत तब्बल ११ वेळा नोटीसा देऊनही ही अतिक्रमणे हटविण्यात रेल्वेला अपयश आले आहे.
चर्चगेट ते खार दरम्यान पश्चिम रेल्वेची ४५ हजार चौरस एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. रेल्वेचे अनेक प्रकल्प सध्या निधीअभावी रखडले आहेत. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारे मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवा-सहावा मार्ग टाकणे, हार्बर मार्गाचा विस्तार तसेच चर्चगेट-विरार एलिव्हेटेड मार्ग सुरू करणे इत्यादी प्रकल्प सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.