मुख्यमंत्र्यांचा दिलासा

शाळा अधिकृत मात्र बांधकामं अनधिकृत तर आरटीईतील त्रुटींमुळे मान्यताही नाही अशा कात्रीत सापडलेल्या मुंबईतल्या शेकडो शाळांना मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मोठा दिलासा दिला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतील अटींमुळे मान्यता न मिळालेल्या शाळांसाठी अटी शिथिल करण्याचे तर मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात या शाळांच्या बांधकामांना  संरक्षण देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मंत्रालयात दिल्या. सरकारी जागांवरील शाळांना त्यांच्या जागा सवलतीच्या दरात नियमित करुन देण्याचा शासन विचार करेल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

कायद्यातील संरक्षक िभत, खेळाचे मदान, रॅम्प इ. सुविधांच्या अभावी ६३४ शाळांच्या मान्यता मुंबई महानगरपालिकेने थांबवल्या होत्या. संरक्षक िभतीच्या अटीतून सवलत देण्यात येईल तर शाळेच्या लगतचे मदानही वापरासाठी मान्य करण्यात येईल असे महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी यावेळी सांगितले. नवीन विकास आराखडय़ात बहुतेक शाळांना संरक्षण देण्यात आले असून ना विकास क्षेत्रातील शाळांच्याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.