महिलेशी अर्वाच्य भाषा केल्याप्रकरणी गुजरात येथील प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी शनिवारी अटक केली. अटकेनंतर या अधिकाऱ्याला महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अधिकारी २०१३ मध्ये मुंबईतील प्राप्तिकर विभागामध्ये कार्यरत होता. त्या वेळेस संबंधित महिला तेथे नोकरीला होती. या अधिकाऱ्याने या महिलेला लग्नासाठी विचारले. परंतु तिने नकार देत नोकरीही सोडली. त्यानंतर या अधिकाऱ्याने तिला मोबोइलवरून अश्लील संदेश पाठवून त्रास दिला.