एशियाटिक सोसायटी संचालित महामहोपाध्याय पां. वा. काणे पदव्युत्तर अभ्यास आणि संशोधन केंद्रातर्फे यंदापासून ‘प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास’ या विषयावरील पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.
सोमवारी एशियाटिक सोसायटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, संशोधन केंद्राच्या परिणीता देशपांडे यांनी याविषयी माहिती दिली. भारताचा इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी नव्या पिढीत आवड  आणि त्यांच्या जागृती निर्माण व्हावी, हा या अभ्यासक्रमामागचा उद्देश आहे. बारावी उत्तीर्ण  असलेल्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.
सप्टेंबर २०१४ पासून सुरू होणारा हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा असेल. दर शनिवारी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत हे वर्ग चालणार आहेत.