इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहात मुंबईत कार्यरत असलेले लेखा व वसुली विभागाचे उप सरव्यवस्थापक श्यामकांत दत्तात्रय खैरे यांचे सोमवारी दीर्घकालीन आजाराने रुग्णालयात निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

मनमिळावू स्वभावाच्या श्याम खैरे यांनी लोकसत्ता व इंडियन एक्स्प्रेससाठी विविध विभागांत प्रदीर्घ काळ सेवा बजावली. नेरूळ येथे सोमवारी सायंकाळी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.