गुंतवणूकविषयक निर्णयांना अचूकता आणि उत्तम लाभाची सोनेरी किनार देणारा ‘लोकसत्ता’च्या ‘अर्थब्रह्म’ या परिपूर्ण गुंतवणूक वार्षिक अंकाचे शुक्रवारी प्रकाशन होत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना साध्या-सोप्या भाषेत गुंतवणुकीचे महत्त्व आणि प्रक्रिया समजावून सांगणारे मार्गदर्शन शिबिरही यानिमित्ताने पार पडणार आहे.
केंद्रातील नव्या सरकारचे गुंतवणुकीवर, प्रामुख्याने भांडवली बाजारावरील सुपरिणाम सुस्पष्टच आहेत. अशा वातावरणात कोणती गुंतवणूक जास्त फायदा मिळवून देईल, असा प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावतो. त्याचे उत्तर ‘अर्थब्रह्म’ आणि त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने होणाऱ्या मार्गदर्शन मेळाव्यातून मिळणार आहे.
शुक्रवारच्या मेळाव्यात ‘वयाच्या प्रत्येक टप्प्यानुरूप व्यक्तिगत आर्थिक नियोजन कसे करावे आणि त्यासाठी आवश्यक गुंतवणुका कोणत्या?’ या विषयावर सीए जयंत गोखले यांचे, दीर्घकालीन लाभाचे शेअर्स निवडून त्यांचा पोर्टफोलियो कसा बनवावा? यावर अजय वाळिंबे यांचे मार्गदर्शन होईल. तर, आर्थिक नियोजनांत महत्त्वाचा घटक असलेल्या कर्जासंबंधाने आवश्यक खबरदाऱ्या आणि स्वत:चे पतमापन कसे करावे? या विषयावर ‘सिबिल’च्या ग्राहक संबंध विभागाच्या प्रमुख हर्षला चांदोरकर या उपस्थित गुंतवणूकदारांचे मार्गदर्शन करतील.
*केव्हा : शुक्रवार, २५ जुलै, सायं. ६.३० वा.
*कुठे : स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर
*नवी मुंबईत : रविवार, २७ जुलै, सायं. ६ वा.
साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, सेक्टर-६, वाशी
*प्रवेश विनामूल्य