प्रतीक्षा यादीत तुमचा क्रमांक ७१वा असतो.. आरक्षणाचा तक्ता तयार होतो, पण तुमच्या मागे यादीत असलेल्या एखाद्याचे प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म होते आणि तुम्ही मात्र प्रतीक्षा यादीतच राहता.. का होते असे? रेल्वेच्या तिकीट यंत्रणेबद्दल थोडीशी माहिती घेतल्यास हा प्रश्न पडत नाही..

लांबपल्ल्याच्या गाडय़ांचे तिकीट हाती पडल्यानंतर त्या तिकिटावर नेमकी काय काय माहिती दिली आहे, त्यापैकी प्रवाशांसाठी उपयुक्त माहिती कोणती, आपले तिकीट कसे वाचावे, आदी अनेक गोष्टी अनेकांना माहीत नसतात. कधीकधी याची सुरुवात आरक्षणासाठी भरायच्या अर्जापासूनच होते. आरक्षणासाठीचा अर्ज कसा भरावा, आरक्षित तिकीट मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी काय क्लृप्त्या कराव्या, अशा अनेक गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

5 home remedies to get rid from mosquitoes how to get rid from mosquito home
डासांच्या उच्छादामुळे रात्री झोपणंही कठीण? मग किचनमधील ‘या’ ५ गोष्टींचा करा वापर, डास होतील गायब
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

आरक्षण अर्ज

कोणत्याही प्रवासी आरक्षण केंद्रावर गेल्यानंतर हा छापील अर्ज भरावा लागतो. त्यात सुरुवातीलाच उजव्या हाताला वर तीन रकाने असतात. त्यात तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला जादा रक्कम न भरता वरच्या दर्जाचे तिकीट हवे असेल, तर बरोबरची खूण करायची असते. समजा एखाद्या प्रवाशाने थर्ड एसी श्रेणीचे तिकीट आरक्षित करताना जादा रक्कम न भरता वरच्या दर्जाचे तिकीट घेण्यासाठी रुकार दर्शवला असेल आणि अंतिम आरक्षण तक्ता तयार झाल्यावर सेकंड एसी श्रेणीतील काही आसने रिक्त असतील, तर त्याला कोणतीही जादा रक्कम न भरता सेकंड एसीने प्रवास करता येऊ शकतो. या अर्जात तिकीट कुठपासून काढायचे आहे आणि तुम्ही कुठे चढणार, ही माहितीदेखील द्यावी लागते. गाडी जेथून सुटणार आहे, तेथून तिकीट काढून गाडीत चढण्याचे स्थानक दुसरे असले, तर त्याचा फायदा संबंधित प्रवाशाबरोबरच दुसऱ्या प्रवाशालाही होऊ शकतो. तो कसा, ते पाहू. उदाहरणार्थ, मुंबईहून सुटणाऱ्या गाडीत पुण्याहून चढणाऱ्या व्यक्तीने मुंबईपासूनचे तिकीट काढून पुण्याहून चढणार असे लिहिले असेल, तर मुंबई ते पुणे या प्रवासासाठी तिकीट काढणाऱ्या प्रतीक्षा यादीतील एखाद्या व्यक्तीला पुण्यापर्यंत त्या आसनावरून प्रवास करता येतो.

तिकीट आणि त्यावरील लघुरूपे

प्रवासाचे तिकीट हाती आल्यानंतर त्यावरील सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुमचा पीएनआर क्रमांक! रेल्वेच्या कोणत्याही आरक्षित तिकिटावर प्रवाशाचे नाव लिहिलेले आढळणार नाही. पण पीएनआर क्रमांकावरून म्हणजेच पॅसेंजर नेम रेकॉर्ड क्रमांकावरून प्रवाशाबद्दलची सगळी माहिती रेल्वेला मिळू शकते. त्यामुळे तुमचे तिकीट हरवले, तरी इतर कोणीही ते सहजासहजी जाऊन रद्द करू शकत नाही.

तिकिटावरील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आरक्षणाची स्थिती! म्हणजे तुमचे तिकीट प्रतीक्षा यादीत असेल, तर तिकिटावर तुमच्या प्रवासी तपशिलासमोर (यात तुमचे वय आणि लिंग याचा समावेश असतो.) डब्ल्यू/एल असे लिहून येते. डब्ल्यू/एल म्हणजे वेटिंग लिस्ट म्हणजेच तुमचे तिकीट प्रतीक्षा यादीत आहे. यातही अनेकदा आरएलडब्ल्यूएल आणि पीक्यूडब्ल्यूएल असे दोन भाग पडतात. या दोन भागांचा अर्थ पाहू!

मघाशी म्हटल्याप्रमाणे मुंबईहून एखादी गाडी सुटणार असेल, तर त्या गाडीचे तिकीट प्रणालीतील रिमोट लोकेशन मुंबई असते. त्याचप्रमाणे गाडी चेन्नईहून सुटणारी असेल, तर हे रिमोट लोकेशन चेन्नई असते. त्यामुळे साधारण प्रतीक्षा यादी ही चेन्नई अथवा मुंबई येथून आरक्षित होणाऱ्या तिकिटांवर बेतलेली असते. या रिमोट लोकेशनसाठीचा कोटा जास्त असतो. त्यामुळे या रिमोट लोकेशनपासून काढणारे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते. या लोकेशनवरून तिकीट काढले आणि ते प्रतीक्षा यादीत असले, तर तिकिटावर आरएलडब्ल्यूएल असे छापून येते.

दुसरा प्रकार म्हणजे पीक्यूडब्ल्यूएल म्हणजेच पूल कोटा वेटिंग लिस्ट! प्रमुख स्थानकाबरोबरच या गाडीच्या मार्गावरील मोठय़ा स्थानकांनाही तिकीट आरक्षणाचा कोटा दिलेला असतो. म्हणजेच मुंबईहून सुटणाऱ्या गाडीत पुण्यासाठीही काही कोटा असतो. एखाद्या प्रवाशाने पुणे-चेन्नई असे तिकीट काढले आणि ते प्रतीक्षा यादीत आले, तर त्याला पीक्यूडब्ल्यूएल असे तिकिटावर छापून येते. त्यामुळे पुण्याहून आरक्षित झालेल्या तिकिटांपैकी काही तिकिटे रद्द झाली तरच ही तिकिटे कन्फर्म होतात.

तिकीट दलाल या अनेक गोष्टींचा वापर खूप खुबीने करून घेतात. उदाहरणार्थ मुंबईहून सुटणाऱ्या गाडीत पुण्याहून एखादी व्यक्ती चढणार असेल, तर तिचे तिकीट लोणावळ्यापासून काढतात. त्यामुळे हे तिकीट जनरल वेटिंग लिस्टमध्ये किंवा रिमोट लोकेशनच्या कोटय़ात जाते. हा कोटा जास्त असल्याने तेथे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते. सामान्यांना या गोष्टी माहीत नसल्याने आपले नाव प्रतीक्षा यादीतच लोंबकळत राहते. कधीकधी मुंबईहून कोलकात्याला जाण्यासाठी मुंबई-हावडा असे थेट तिकीट प्रतीक्षा यादीत येऊ शकते. पण तेच तिकीट मुंबई-नागपूर आणि नागपूर-हावडा अशा दोन टप्प्यात काढल्यास मुंबई ते नागपूर या दरम्यानचा कोटा आणि नागपूरपासून मिळणारा ‘पूल कोटा’ यांद्वारे कन्फर्म मिळू शकते.

तिकीट हरवल्यास..

अनेकदा पहिल्याच फटक्यात आरक्षित तिकीट मिळते आणि प्रवासाच्या काही दिवस आधी अगदी ‘जप्पूऽऽऽन’ म्हणून ठेवलेले तिकीट हरवल्याचा साक्षात्कार होतो. अशा वेळी तुमचे तिकीट तुम्हाला शोधूनही सापडणार नाही, याची खात्री पटल्यावर प्रवासी आरक्षण केंद्रात जाऊन ‘तिकीट हरवले’ या सदराखाली तुम्हाला ही बाब नोंदवता येते. ही नोंद केल्यानंतर तुम्हाला तुमचे तिकीट सापडले, तरी तुम्ही ते रद्द करू शकत नाही. तुम्हाला कन्फर्म किंवा आरएसी (रिझव्‍‌र्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट मिळाले असेल, तर तुम्हाला मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाकडून तिकिटाची दुसरी प्रत प्राप्त होऊ शकते.

तिकीट दुसऱ्याच्या नावे करायचे असल्यास..

गावी असलेल्या पालकांची तब्येत बिघडली आहे आणि त्यांना भेटायला जाण्यासाठी म्हणून तुम्ही तिकीट आरक्षित करता. आयत्या वेळी काही कामामुळे तुमच्याऐवजी तुमचा सख्खा भाऊ, बहीण, नवरा, बायको किंवा मुलगा यांना जावे लागते. अशा वेळी तुमचे तिकीट त्यांच्या नावे करता येऊ शकते. त्यासाठी तिकीट ज्याच्या नावे करायचे, तो तुमच्या सख्ख्या नात्यात असणे आवश्यक असते. त्याशिवाय एक अर्ज, त्या अर्जासोबत संबंधित व्यक्ती तुमच्या नात्यात असल्याचा पुरावा आणि तिकिटाची एक प्रत जोडून आरक्षण केंद्रात सादर केल्यास तुमचे तिकीट तुमच्या नातेवाईकाच्या नावे होऊ शकते.

रेल्वेची तिकीट प्रणाली हे मोठे जंजाळ आहे. अनेक प्रकारचे कोटा, विविध स्थानकांपासून सुरू होणारे कोटा त्यामुळे अनेकदा तिकीट काढताना गोंधळ उडतो. त्यामुळेच ही प्रणाली समजून घेणे आवश्यक ठरते.

tohan.tillu@expressindia.com

@rohantillu