जय जवान गोविंदा पथकाचा निर्णय 

न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर व गोविंदांच्या वयावर बंधने आणल्याने गोविंदा पथकांनी विविध मार्गानी निषेधाचा मार्ग अवलबंला आहे. जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाने त्यांना मिळालेले गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र राष्ट्रपतींना परत पाठवण्याचा इशारा दिला.

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
maharashtra prantik tailik mahasabha , demands, check vijay wadettiwar caste certificate, prakash devtale, sudhir mungantiwar, pratibha dhanorkar, chandrapur lok sabha seat,
“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; खोट्या स्वाक्षऱ्या करून काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा आरोप
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

सर्वाधिक मानवी मनोऱ्याच्या उंचीचा विक्रम स्पेनच्या नावावर होता. ३९.२७ मीटर उंचीचा स्पेनचा विक्रम २१ वर्षे टिकला होता. मात्र जय जवान गोविंदा पथकाने २०१३ मध्ये ४३.७२ फूट उंचीचा मानवी मनोरा लावून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते.

न्यायालयाने वीस फुटांहून अधिक उंचीचे मनोरे लावण्यासाठी तसेच १८ वर्षांखालील मुलांना मनोऱ्यात सहभागी होण्यासाठी मनाई केली. त्यामुळे अधिकाधिक उंचीचे मनोरे लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पथकांनी जोरदार विरोध सुरू केला. त्याचाच भाग म्हणून जय जवान गोविंदा पथक गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेले प्रमाणपत्र राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पाठवणार आहे. सरकार आतापर्यंत आमच्याकडे विक्रमवीर म्हणून पाहत होते. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला. मात्र न्यायालयाच्या एका निर्णयामुळे गेल्या काही वर्षांत देण्यात आलेले प्रोत्साहन मातीमोल ठरले असून आमच्या कौशल्याला कोणी वाली उरला नाही, असे पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले. या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रपतींकडे विक्रम परत पाठवणार असल्याचे ते म्हणाले.