३७ वा जमनालाल बजाज फाऊंडेशन पुरस्कार सोहळा २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबईत नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’ येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी तर अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत. सत्यार्थी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. जनपद सेवा ट्रस्टचे संस्थापक सुरेंद्र कौलगी (बांधकाम क्षेत्र), सुरुची शिक्षण वसाहत ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त व संचालक रामकुमार सिंह (ग्रामीण विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर), वसाव्य महिला मंडळीच्या संस्थापक अध्यक्षा चेन्नुपाटी विद्या (महिला आणि बाल कल्याण) आणि इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट-थायलंड या संस्थेचे संस्थापक सुलक शिवरक्षा (आंतरराष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार) यांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.