पश्चिम रेल्वेवर कांदिवली-बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने बुधवारी रात्री पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकारामुळे डाऊन धिम्या मार्गावरील (विरारच्या दिशेने जाणारी)  सर्व वाहतूक डाऊन जलद मार्गावरून वळविण्यात आली. धिम्या मार्गावर एकामागोमाग एक लोकल गाडय़ांची रांग लागल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बराच वेळ झाला तरी गाडी सुरू होत नसल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे मार्गातून चालायला सुरुवात केली.

 

ओव्हर हेड वायर