मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल अमीर कसाबला फाशी देऊन राज्य शासनाने ख-या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहिली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कसाबला फासावर चढवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे, असे सांगत या कामगिरीबद्दल संजय राऊत यानी सरकारचे अभिनंदनही केले आहे. दहशतवादी अजमल कसाबला फाशी द्यावी ही बाळासाहेबांची इच्छा होती आणि जेव्हा जेव्हा त्यांनी मुंबई हल्ल्याबद्दल लिहिले किंवा जाहिर सभेत बोलले तेव्हा त्यांनी त्याचा उच्चार केला होता, असंही ते पुढे म्हणाले.
आज सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.




















हे राऊत साहेब वाड्याचे तेल वांग्या वर नेण्यात पटाइत आहेत. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात काय अर्थ आहे ?
राऊत, जरा थंड घ्या राव. सरकारचे अभिनंदन ठीक आहे पण शिवसेनाप्रमुखांना हि आदरांजली नाही. कारण त्यांची इच्छा म्हणून सरकारने धावाधाव करून कासाबला ताबडतोब फाशी दिले नाहीये. ती प्रोसेस चालू होती व वेळापत्रकाप्रमाणे पार पडली. उगाच सरकारला तुम्ही मधल्या मध्ये श्रेय देत आहात. जर सरकारला श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी जे कैदी प्रोसेस मध्ये नाहीयेत त्यांना (अफझल गुरु सारखे द्रोही) ताबडतोब फाशी द्यावी मगच तिला आपण सरकारने वाहिलेली श्रद्धांजली म्हणूया. तुम्ही खासदार आहात तुम्हाला कोण प्रोसेस मध्ये आहे माहित करून घेता येईल. जर गुरुचे नाव नसेल नि ३ दिवसात फाशी दिली गेली तर ती श्रद्धांजली.