आवडीचं जेवण कुठलं असा प्रश्न कुणालाही विचारला तर त्याचं उत्तर ठरलेलं असतं – आईच्या हातचं. आई ते जेवण तिच्या आई-आजीकडून शिकलेली शिकलेली असते किंवा काळाप्रमाणे तिच्या स्वत:च्या प्रयोगातून तिने ते कौशल्य आत्मसात केलेलं असतं. अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींनासुद्धा तिच्या हातची चव आवडून जाते आणि मग आपसूकच आपली कॉलर टाइट होते. पंकज नेरूरकर यांचंसुद्धा असंच काहीसं होतं. स्वत: पेशाने शेफ असूनही त्यांना नेहमी आपली आई अंजली हिच्या हातचंच जेवण आवडत असे. त्यात ते मूळचे कुडाळचे. त्यामुळे मासे (समुद्रातले आणि सुके), चिकन आणि मटण हा आहारातील अविभाज्य भाग. आपल्या आईच्या अस्सल रेसिपींचा आस्वाद केवळ आपणच का घ्यावा? जगालासुद्धा अस्सल मालवणी, कोकणी पद्धतीचं घरचं जेवण कसं असतं हे का कळू नये, या उद्देशाने सुरू झालंय खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत.

प्रभादेवीच्या या छोटेखानी रेस्टॉरंटमध्ये शिरताच त्याचं वेगळेपण लक्षात येतं. कारण इथे आहे ओपन किचन. त्यामुळे टेबलवर बसून तुम्ही किचनमध्ये काय शिजतंय हे सहज पाहू शकता. एवढंच नव्हे तर या किचनमध्ये तुम्हाला पुरुष नाही तर स्त्री शेफ दिसतील. वरळी गावातल्या संगीता, दीप्ती, साक्षी, शोभाताई आणि बने वहिनी या किचनची जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत. त्यांच्या जोडीला स्वत: पंकज आणि सुदर्शन किचनचा भार आपल्या खांद्यावर वाहतात. थाळीची आवड असणाऱ्यांसाठी चिकन, मटण, फिश, अंडा अशा सर्व थाळ्या तुम्हाला येथे मिळतील. पण त्याशिवायही मांसाहारी स्पेशल आणि तळलेले मासे या शीर्षकाखालीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बोंबील भुजणं, किसमूर, मोरीचं कालवण, तिसऱ्याचं सुकं, कुल्र्यामसाला, जवळामसाला, कोलंबी कोळीवाडा, खेकडे हे अस्सल मालवणी पद्धतीने तयार केलेले पदार्थ आहेत. तर तळलेल्या माशांमध्ये पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबील, मांदेली यांचा समावेश आहे. स्पेशल मासळी प्रकारात उपलब्धतेनुसार घोळ, मोदकं  यांचं कालवण खास कोकणी पद्धतीने तयार केलं जातं.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

खडपे हे तळकोकणातले प्रसिद्ध आचारी. त्यांचं जेवण चवीला अप्रतिम असतं. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून पंकज यांनी आपल्या रेस्टॉरंटचं नाव खडपेज् ठेवलं आहे. इथल्या पदार्थासाठी लागणारा प्रत्येक मसाला आणि तेल कुडाळहून तयार होऊन येतं. तिथे त्याचं स्वत:चं कांडप मशीन आणि खोबऱ्याच्या तेलाचा घाणा असल्याने भेसळीची शक्यता नसते आणि प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रमाण वापरून हवा तसा मसाला तयार केला जातो. आईच्या रेसिपींची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी पंकज यांची बायको दीप्ती यांनी वरळी गावातून योग्य बायका शोधून काढल्या. त्यांना पंकज यांनी स्वत: प्रशिक्षण दिलं. त्यामुळे इथे जेवताना घरीच बसून जेवतोय असं वाटतं.

फिश, मटण किंवा चिकन असो इथली प्रत्येक ग्रेव्ही दिसायला आणि चवीलाही वेगळी आहे. प्रत्येक ग्रेव्हीचा मसाला वेगळा आहे आणि त्यांना दिलेली ट्रीटमेंटही. मालवणी, कोकणी आणि गोवन पद्धतीचं फूड असल्याने त्याचे मसाले तर वेगळे आहेतच पण तिखटाचा मसालाही वेगळा आहे. त्यामुळे मटण तिखट असलं तरी ते घशाला लागत नाही. माशांच्या कालवणात तिरफळ असतं. प्रत्येक ग्रेव्हीचं वाटण वेगळं आहे. खोबरं वाटपाची पद्धत आणि त्याची जाडीदेखील वेगळी. त्यामुळे मालवणी पद्धतीचे कोंबडी-वडे खायचे असतील तर इथे जरूर भेट द्या.

शाकाहारींसाठी या ठिकाणी व्हेज थाळी, काळा वाटाणा उसळ, पिठलं-भाकरी, वालाची उसळ, मटकीची उसळ, पनीर मखनी हे पर्याय आहेत. याशिवाय श्रीखंड, बासुंदी-पुरी, मोदक अशा गोड पदार्थाचीही इथली चव न्यारी आहे. या ठिकाणी सिझलिंग मोदक मिळतात. सिझलर प्लेटवर हळदीचं पान लावल्यावर ती क्रॅकल्ड व्हायला लागते. त्यावर मोदक ठेवून साजूक तुपाची धार सोडली जाते. वाफेमुळे तो मोदक पानाचा सर्व फ्लेवर खेचून घेतो आणि मोदकाची लज्जत आणखी वाढते.

तब्बल सोळा र्वष पंकज या व्यवयासात आहेत. कोहिनूरमधून केटरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर ग्रॅण्ड हयात, काही र्वष अमेरिकेत बोटीवर, आयरीश हाऊसचा संशोधन विभाग सांभाळणं असा तगडा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने त्यांना पदार्थाची, ट्रेंडची आणि लोकांच्या चवीची चांगलीच ओळख आहे. भाऊ  पारस आणि वडील प्रभाकर नेरूरकर यांच्या बरोबरीनेच मित्र विशाल करंगुटकर यांचीही पंकजला मोलाची साथ लाभत आहे. कॉन्टीनेंटल फूडचं आयुष्य दीड ते दोन वर्षांचंच असतं कारण नंतर लोकांना तेच तेच खाण्याचा कंटाळा येतो; परंतु आपल्या प्रादेशिक पदार्थाचं तसं नाही. त्यामुळे सध्या छोटासाच मेन्यू असला तरी भविष्यात तऱ्हेतऱ्हेचे पारंपरिक पदार्थ लोकांना खाऊ  घालण्याचा पंकज यांचा मानस आहे.

खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत

  • कुठे – शॉप नं. ७, थ्री व्ह्य़ को-ऑ. हा. सो. लि, अनुभव हॉलिडेजच्या बाजूला, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५
  • कधी – सकाळी ११ ते दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत. सोमवारी बंद.
  • मराठमोळं आइस्क्रीम या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या ‘द आइस्टसी प्रोजेक्ट्स’ यांचा संपर्क क्रमांक अनवधानाने चुकीचा छापला गेला होता. योग्य संपर्क क्रमांक ९०२९०००११३ हा आहे.

nanawareprashant@gmail.com

@nprashant