नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. जाधव यांच्या मुलाच्या लग्नात किमान १० कोटी रुपये खर्च झाले असून त्यासंदर्भात काही महत्त्वाची कागदपत्रेही त्यांनी सादर केली आहेत.
जाधव यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये निवडणुकीचा अर्ज भरताना आपली मालमत्ता ९८ लाख असल्याचे जाहीर केले होते. एकूण मालमत्ता १ कोटी ४८ लाख असून ५० लाखांचे कर्ज त्यांनी दाखवले होते. त्यामुळे त्यांची मालमत्ता ९८ लाख असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. संपुर्ण कुटुंबाची मिळून ही मालमत्ता होती. त्यात पत्नी आणि मुलांचा समावेश होता. तसेच ही स्थावर मालमत्ता होती. मंत्री झाल्यावर त्यांनी व्यवसाय केला नाही. मग एवढा खर्च केला कसा, असा आक्षेप सोमय्या यांनी घेतला आहे.