कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता वायफाय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मडगाव स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय रत्नागिरी-मडगाव या नवीन गाडीचाही शुभारंभ होणार आहे. मडगाव स्थानकात ही सेवा प्रथम सुरू केली जाणार आहे. त्यानंतर खेड, रत्नागिरी, सावंतवाडी आदी स्थानकांत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.  कोकण रेल्वेवर रत्नागिरी-मडगाव ही नवीन ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. येत्या ३१ मार्च रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते याचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.