प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ८६ वर्षांच्या कृष्णा राज कपूर यांना वयोमानानुसार काही रोजच्या चाचण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. कृष्णा यांना गेल्या आठवडय़ाभरापासून रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे आणि लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी नेण्याची परवानगी मिळेल, असे स्पष्ट करत अधिक काही सांगण्यास त्यांच्या नातेवाइकांनी नकार दिला.