कोपर्डी प्रकरणी संताप व्यक्त करून ऑलिम्पिकपटू ललिता बाबर पुण्यात मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाली होती.

कोणत्याही जातीचे सदस्य अथवा क्रीडापटू म्हणून नव्हे तर सर्वसामान्य महिला म्हणून मी या मोर्चात सहभागी झाले होते. अशा प्रकारचे कृत्य कधीही घडू नये माझी इच्छा आहे, शाळेत जाणाऱ्या मुलींवर असा प्रसंग ओढवणे संतापजनक आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून मी खेडय़ाबाहेर पडले असले तरी माझे पालक अद्यापही शेतातच काम करतात, मात्र निर्घृण हत्या करण्यात आल्याने मुलींना यापुढे घराबाहेर पडताना विचार करावा लागेल, महिलांना इतके असुरक्षित वाटते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, असे ललिता बाबर म्हणाली.