सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध धाब्यावर ठेवत मुंबईनगरीतील काही गोविंदानी थरावर थर लावण्याची परंपरा कायम ठेवली. ठाण्यात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने ९ थर लावून कायद्याचे उल्लंघन केले. न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदा पथकांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून या पथकांना आता कारवाईस समोर जावे लागणार आहे. कलम १८८ अंतर्गत ठाण्यातील १९ गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  शहरातील विविध भागात हंडीचा थरारक खेळ करताना आतापर्यंत ७० हून अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यापैकी ५४ गोविंदांना प्राथमिक उपचारानंतर सोडले असून १७ गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान एका बाजूला न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन होत असताना शहरातील काही भागात अनोख्या पद्धतीने न्यायालयाचा निषेध नोंदविण्यात आला. ज्या ठाण्यामध्ये दिवसाच्या सुरुवातीला न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले, त्याच ठिकाणी जतन गोविंदा पथकाने न्यायालयाने दिलेल्या नियमाचे पालन करत असल्याचे दाखविण्यासाठी चक्क मोजपट्टी तोंडात धरुन थर लावले. दरवर्षीप्रमाणे उत्सवात हंडी साजरी करण्यासाठी या पथकाने अनोख्या पद्धतीने हंडी फोडली. गोविंदा पथकात शेवटच्या थरावर असणाऱ्या गोविंदाने आपल्या तोंडात मोजपट्टी धरली होती. त्याद्वारे २० फुटांचे मोजमाप घेऊन ते मनोरा उभा करताना दिसले. दहीहंडीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा मुंबईतील गोविंदा पथकांकडून उत्साहाने निषेध देखील नोंदविल्याचे दिसले. गोविंदा मंडळांकडून न्यायालयाने घालून दिलेल्या उंचीच्या मर्यादेचे पालन करत सर्वात वरच्या थरावरील गोविंदाकडून काळे झेंडे दाखवून सलामी देण्यात आली. दहीहंडीच्या उंचीवर २० फुटांची मर्यादा घालण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे गोविंदांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र, गोविंदा पथकांनी आज उत्साहात रस्त्यावर उतरत अनोख्या पद्धतींनी न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला.  ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी ‘मी कायदा मोडणार’ अशी नावं लिहिलेली टी शर्ट परिधान करुन पथकात सहभागी झाले होते. गोरेगावच्या गांवदेवी महिला गोविंदा पथकाचीही पाच थरांची हंडी. उंचीची मर्यादा आणि वयाची मर्यादा दोन्ही मर्यादांचा भंग केला.  तर दादरमध्ये कोकण नगर या जुन्या दहीहंडी पथकाने, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जमिनीवर झोपून नऊ थर रचले. जोगेश्वरीतील साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली.

 

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Hindu Marriage Act
“हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

फोटो गॅलरी : निषेधाचे थर – काळे झेंडे, शिडी आणि मोजपट्टी 

मुंबईच्या दादर परिसरात कोकणनगर गोविंदा पथकाने रस्त्यावर आडवे झोपून नऊ थरांची हंडी रचली. त्यानंतर याठिकाणी अनेक गोविंदा पथकांनी चार थर लावून हंडीला सलामी दिली. मात्र, यावेळी चौथ्या थरावरील गोविंदांच्या हातात काळे झेंडे दिसत होते. विशेष म्हणजे ही हंडी फोडतानाही गोविंदा पथकांनी एकत्र येत आणखी एक अनोखी शक्कल लढविली. गोविंदा पथकांकडून याठिकाणी एक शिडी आणून हंडीदेखील सर्वात खालच्या थरापर्यंत उतरवण्यात आली होती. त्यानंतर गोविंदा पथकाच्या प्रशिक्षकांनी शिडीवर चढून ही हंडी फोडली. एकुणच संपूर्ण मुंबईत ‘निषेधाचे धर’ लावल्याचे चित्र दिसत आहे.

फोटो गॅलरी : दहीहंडीचा थरार आणि जल्लोष

 

thane-handi