तब्बल१३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिट अँड रन खटल्यात सत्र न्यायालयाने बुधवारी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवले. न्यायाधीशांनी सलमान दोषी  असल्याचा निकाल देत पाच वर्षांची शिक्षा सुनाविल्यानंतर पडद्यावरचा अॅक्शन हिरो भावुक झालेला पहायला मिळाला. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी सलमानला धीर देण्याचा प्रयत्न केला. सलमानचे वकील शिक्षा सौम्य करण्यासाठी युक्तिवाद करतानाच सलमानचे डोळे भरून येत होते.  
तत्पूर्वी सलमान खान न्यायालयात येण्यासाठी घरातून निघण्यापासूनच प्रत्येक घडामोडीकडे नाट्यमयदृष्टीने पाहिले जात होते. या सुनावणीसाठी सलमानची बहीण अर्पिता, बंधू सोहेल आणि अरबाज खान न्यायालयात उपस्थित होते. खान कुटुंबातील सर्व सदस्य सुनावणी कक्षातील मागील बाजूस बसून प्रार्थना करताना दिसत होते. मात्र, अखेर न्यायालयाने सलमानला दोषी ठरवल्याने खान कुटुंबियांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या.  सलमान खान मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना हा अपघात झाल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यानंतर सलमान दोषी असल्याचे ठरवत या गुन्ह्यासाठी १० वर्षांची शिक्षा असल्याचे न्यायाधीशांकडून सलमानला सांगण्यात आले. याबद्दल तुम्हाला काही बोलायचे आहे का, असे न्यायाधीशांनी सलमानला विचारले. मात्र, हताश झालेल्या सलमानने काहीही न बोलता आपल्या वकीलांकडे इशारा केला. सध्या सलमान खानचे वकील शिक्षेचे स्वरूप सौम्य करण्यासाठी न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. सलमानला दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्याची बहीण अर्पिता आणि अलविरा या दोघींनाही अश्रू अनावर झाले आणि त्यांनी रडण्यास  सुरूवात केली. 
आजचा  निकालाचा दिवस उजाडल्यापासूनच प्रसारमाध्यमांसह सामान्यांचे खटल्याच्या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, या न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या निवासस्थानी आणि सत्र न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्यांची आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मोठ्याप्रमाणावर गर्दी झालेली पहायला मिळत आहे.

दरम्यान आज सकाळपासून या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम कसा राहिला यावर टाकलेली नजर:

* सलमानला जामीन मिळवून देण्यासाठी सलमानचे वकील, बाबा सिद्दीकी उच्च न्यायालयात दाखल
* सलमान खानला जामीन मिळविण्यासाठी तीन दिवसांचा अवधी
* खान कुटुंबिय सलमानभोवती गोळा,  सलमानला धीर देण्याचा प्रयत्न
* शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानला अश्रू अनावर
* सलमान खान मुंबई पोलीसांच्या ताब्यात, आज रात्रीचा मुक्काम आर्थर रोड तुरूंगात
* सलमान खान शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणार
* सलमान खानला पाच वर्षांचा कारावास आणि २५ हजारांच्या दंडाच्या शिक्षेचा निर्णय
* सलमानच्या आईच्या पकृतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रीती झिंटा सलमान खानच्या निवासस्थानी दाखल
* सुनावणी कक्षातील वीजपुरवठा खंडित
* न्यायालयाच्या निकालपत्रात सलमानने त्या रात्री रेन बारमध्ये मद्यप्राशन केल्याचे नमूद, गाडी चालविण्याचे लायसन्सही जवळ नसल्याचे नमूद
* सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, सरकारी वकिलांची मागणी
* सरकारी वकिलांच्या युक्तीवादाला सुरूवात.
* सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद संपला.
* सलमानला कमीत कमी शिक्षा सुनावण्याची बचाव पक्षाची माहिती.
* सलमानने २००२ सालापासून एकही नियम मोडलेला नाही. तसेच सलमानच्या अनेक समाज कार्यांचा दाखला न्यायालयात देण्यात आला.
* सुनावणी कक्षाचे दार बंद करून न्यायालयाच्या कामकाजाला पुन्हा सुरूवात
* प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीसांमध्ये जोरदार धक्काबुक्की, न्यायालयाचे कामकाज थांबविण्यात आले
* निकालानंतर सलमान खानच्या आईची पकृती बिघडली
* वकीलांचा युक्तीवाद सुरूवात असताना सलमान खानला अश्रू अनावर
* न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास सोहेल आणि अरबाज खानचा नकार
* सलमानला दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्याची बहीण अर्पिता आणि अलविरा या दोघींनाही अश्रू अनावर झाले आणि त्यांनी रडण्यास  सुरूवात केली.

* बचावपक्षाकडून शिक्षा सौम्य करण्याविषयीच्या युक्तिवादाला सुरूवात 
* न्यायालयाचा निर्णय ऐकल्यानंतर सलमान खान हताश

* सलमान खानने काहीही न बोलता आपल्या वकीलाकडे बघितले
* याविषयी तुमचे काही म्हणणे असल्यास न्यायालयासमोर मांडावे, न्यायाधीशांची सलमानला सूचना
* या गुन्ह्यासाठी १० वर्षांची शिक्षा होऊ शकल्याचे न्यायाधीशांनी सलमानला सांगितले
* सत्र न्यायालयाकडून सलमान खान दोषी असल्याचा निर्णय
* सलमान खानवरचे सर्व आरोप सिद्ध झाल्याची न्यायालयाची स्पष्टोक्ती
* सलमान खान मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा
* न्यायालयात सलमान खानच्या नावाचा पुकारा
* न्यायालयाच्या कामकाजाला सुरूवात
* सलमान खानचे कुटुंबिय सत्र न्यायालयाच्या सुनवाणी कक्षात दाखल, सोहेल खान मागे बसून प्रार्थना करत आहे.
*सलमान खान सत्र न्यायालयात दाखल
* सलमानची बहीण अर्पिता आणि अन्य नातेवाईकही न्यायालयात दाखल
* सलमानचे दोन्ही बंधू सोहेल आणि अरबाज खान सत्र न्यायालयात दाखल
* चालक अशोक सिंह हाच सलमानला घेऊन न्यायालयाकडे  रवाना
* सेशन्स कोर्टाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, पोलिस बंदोबस्त वाढवला
* सत्र न्यायालयाबाहेर प्रसार माध्यमांची गर्दी
* सलमान वरळी सी-लिंकवरुन पुढे रवाना
* सलमानला पोलिसांकडून कोणतीही विशेष सुरक्षा नाही
* सलमानसोबत भाऊ अरबाज खान आणि अंगरक्षक शेराही
* कुटुंबियांची भेट घेऊन सलमान खान सत्र न्यायालयाकडे रवाना
* कोर्टाकडे रवाना होताना सलमानने वडील सलीम यांची गळाभेट घेतली
* सलमान खानची बहीण अर्पिता खान, बंधू सोहेल आणि अरबाज खान न्यायालयात जाण्यासाठी निवासस्थानाबाहेर
* सलमान खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, देव हातात घेऊन सलमानसाठी प्रार्थना