इन्स्टाग्रामवर अकाऊंट असलेले एकमेव मराठी वर्तमानपत्र
छायाचित्रे,व्हिडीओ आदानप्रदानासाठी जगभरात लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवर ‘लोकसत्ता’ने दहा हजार वाचकांचा टप्पा पार केला आहे. मराठी वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या दुनियेत इन्स्टाग्रामवर अकाऊंट असलेले आणि वाचकांना सतत नवनवीन छायाचित्रांची मेजवानी देणारे ‘लोकसत्ता’ हे एकमेव वर्तमानपत्र ठरले आहे. दर्जेदार बातम्या, संपादकीय आणि विशेष लेखांद्वारे वाचकांच्या मनात घर केलेल्या ‘लोकसत्ता’ने वर्तमानपत्रासोबतच फेसबुक, ट्विटर, गुगलप्लस आणि यूटय़ूब या समाजमाध्यमांमध्ये आजवर अग्रक्रम राखला आहे.
* या अकाऊंटवर ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाच्या छायाचित्रकारांनी टिपलेली छायाचित्रे वाचकांना पाहावयास मिळतात. तुमचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट असल्यास <www.instagram.com/loksattalive> या लिंकवरून आम्हाला फॉलो करू शकता.