कुठे राजकारणाच्या पटावरील मान्यवर मोहरे, तर कुठे सामाजिक चळवळीला दिशा देणारे समाजकारणी; कुठे आर्थिक विषयातील तज्ज्ञ, तर कुठे मोठे उद्योजक; कुठे राज्याचा गाडा योग्य दिशेने हाकणारे सनदी अधिकारी, तर कुठे जगण्यातील आनंदनिधान देणारे कला व संगीत क्षेत्रातील दिग्गज.. जवाहिरखान्यातील एखादी मौल्यवान संदूक उघडी पडून त्यातील रत्नांमुळे आसमंत झगमगावा, त्याचप्रमाणे एक्स्प्रेस टॉवर्सच्या दुसऱ्या मजल्यावरील हिरवळीवर समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने वातावरण भारून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यावर तर या मांदियाळीची आभा आणखीनच विस्तारली. निमित्त होते ‘लोकसत्ता’च्या ६९व्या वर्धापन दिनाचे आणि ‘लोकसत्ता वर्षवेध’ या वार्षिक अंकाच्या प्रकाशनाचे!

तन्वी हर्बल प्रस्तुत आणि सपट ग्रुप परिवार चहा यांचे सहकार्य लाभलेल्या ‘लोकसत्ता वर्षवेध’ पॉवर्ड बाय आयुशक्ती, केसरी, सी लिंक प्रॉपर्टीज, गोविंद मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स आणि इंडियन ऑइल या वार्षिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते झाले. या वार्षिक अंकासाठी टीजेएसबी सहकारी बँक लि. हे बँकिंग पार्टनर म्हणून होते. या निमित्ताने राज्याच्या विविध क्षेत्रांमधील दिग्गज अशा दहा व्यक्तींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दहा प्रश्न चित्रफितीद्वारे मांडले आणि मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याच प्रश्नांची विस्तृत उत्तरे दिली.

कार्यक्रमस्थळी सव्वापाचपासूनच मान्यवरांचे आगमन व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला येणाऱ्यांमध्ये बोलक्या बाहुल्यांच्या कलेतील जागतिक दर्जाचे कलाकार रामदास पाध्ये आणि त्यांच्या पत्नी, पं. अजय पोहनकर, सनदी अधिकारी प्रवीण दराडे, पल्लवी दराडे आदींचा समावेश होता. त्यानंतर हळूहळू सर्वच मान्यवर यायला सुरुवात झाली. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी सर्वानी एकच गर्दी केली. त्यांनीही सगळ्यांसह मनमोकळ्या गप्पा मारीत सर्वानाच ‘न्याय’ दिला. भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार आल्यानंतर तर आठवले यांनी त्यांची गळाभेट घेत ‘युती’ भक्कम असल्याचे संकेत दिले. त्याशिवाय हुसेन दलवाई, राज पुरोहित, नारायण राणे आदी नेतेही गप्पांमध्ये रंगले होते.

एवढय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर सगळ्यांचेच लक्ष त्यांच्याकडे गेले. इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज व्हर्गिस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या तिघांच्या हस्ते ‘अन्यथा’ आणि ‘तुका राम दास’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर वाय. एम. देवस्थळी, माधव गाडगीळ, डॉ. अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मेधा पाटकर, अजित रानडे, प्रदीप आपटे, प्रसाद पुरंदरे आणि अतुल कुलकर्णी यांचे प्रश्न चित्रफितीद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आले. लोकसत्ता वरिष्ठ साहाय्यक संपादक दिनेश गुणे यांनी या मुलाखतीची सूत्रे सांभाळली. मुख्यमंत्र्यांनीही दिलखुलासपणे या प्रश्नांची उत्तरे देत कार्यक्रम रंगतदार केला.

या मुलाखतीनंतर ‘लोकसत्ता वर्षवेध’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तन्वी हर्बलचे डॉ. पुष्कराज धामणकर, सपट ग्रुपचे जे. आर. जोशी, केसरी टुर्सचे प्रमोद दळवी, गोविंद मिल्कचे राजीव मित्रा, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे सुनील साठे मंचावर उपस्थित होते.

‘लोकसत्ता ग्रंथमाला’ उपक्रमांतर्गत डायमंड प्रकाशनतर्फे  ‘अन्यथा’ या गिरीश कुबेर यांच्या लेखांच्या संग्रहाचे आणि ‘तुका-राम-दास’ या तुलसी आंबिले आणि समर्थ साधक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना  ‘डायमंड’चे दत्तात्रय पाष्टे, इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज व्हर्गीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका.  
‘लोकसत्ता ग्रंथमाला’ उपक्रमांतर्गत डायमंड प्रकाशनतर्फे  ‘अन्यथा’ या गिरीश कुबेर यांच्या लेखांच्या संग्रहाचे आणि ‘तुका-राम-दास’ या तुलसी आंबिले आणि समर्थ साधक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना  ‘डायमंड’चे दत्तात्रय पाष्टे, इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज व्हर्गीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका.

 ‘युतीनेच  केक कापतोय!   

‘लोकसत्ता’च्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकत्र केक कापला. यावेळी हा केक आपण ‘युती’नेच कापत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच एकच हशा उसळला.

मान्यवरांची मांदियाळी..

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अशोक चव्हाण, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार निलम गोऱ्हे, अतुल भातखळकर, नितेश राणे, अतुल शहा, माजी मंत्री सुरेश शेट्टी, खासदार गोपाळ शेट्टी, कामगार नेते अजित सावंत, तसेच मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, अणु ऊर्जा आयोगाचे सहसचिव आर. ए. राजीव, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त (जनसंपर्क) संदीप माळवी, माहिती जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे, माध्यम सल्लागार राम दोतोंडे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रविण दराडे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने, हरकिसनदास रुग्णालाचे संचालक डॉ. गुस्ताद डावर, डॉ. रेखा डावर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक (लाच-लुचपत प्रतिबंध विभाग) विवेक फणसाळकर, सह-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, प्रताप दिघावकर, पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक, अशोक दुधे, मनोजकुमार शर्मा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, आयआयटी मुंबईतील साइनचे संचालक मिलिंद अत्रे, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंह, बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हणमंत गोफणे, एसटीचे जनसंपर्क अधिकारी अब्दुल तांबोळी, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. अजय पोहनकर, ज्येष्ठ संगीत समीक्षक अमरेंद्र धनेश्वर, ‘शब्दभ्रमकार’ रामदास व अपर्णा पाध्ये, ‘झी स्टुडिओ’चे निखिल साने, ‘ती सध्या काय करते’चे दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, नाटय़निर्माते व व्यावसायिक नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, निर्माते व दिग्दर्शक अजित भुरे, निर्माते नितीन वैद्य, ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, धनश्री धारप, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्जचे अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, आयडीएफसी लि.चे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये, कोकुयो कॅम्लिनचे कार्यकारी संचालक श्रीराम दांडेकर, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीजचे संचालक अमित राजे, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्जच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रुपा रेगे-नित्सुरे, हिंदुस्तान युनिलिव्हरचे उपाध्यक्ष प्रसाद प्रधान, टीजेएसबी बँकेचे मुख्याधिकारी सुनील साठे, टीजेएसबी बँकेचे ज्येष्ठ संचालक विद्याधर वैशंपायन, एसएमई चेंबरचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, एनकेजीएसबीचे व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी, श्री धूतपापेश्वर लि.चे व्यवस्थापकीय संचालक रणजीत पुराणिक, केसरीचे प्रमोद दळवी, एम-इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके,  वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार, मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बन्सोड.