वाशीत आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम

दोलायमान स्थितीतील भांडवली बाजार आणि त्यावर अवलंबून म्युच्युअल फंडांचा प्रवास यांचा संबंध स्पष्ट करणारा ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूक मार्गदर्शनपर कार्यक्रम शनिवार, ३० जुलै रोजी वाशी, नवी मुंबईत होत आहे.

अर्थसाक्षरतेवर भर देणारा ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’  प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम मुंबईतील विलेपार्ले, मुलुंडनंतर आता वाशीकरांसाठी होत आहे. मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर -६, वाशी येथे सायंकाळी ६.०० वाजता होईल. आर्थिक नियोजनकार मिलिंद अंध्रुटकर हे यावेळी ‘अर्थ नियोजनातून स्वप्नपूर्ती’ विषयावर मार्गदर्शन करतील; तर ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभ लेखक वसंत कुलकर्णी  हे ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे’ यावर भाष्य करतील.

बचतीचे विविध ठेवींसारखे पर्याय तसेच निर्वाह निधी, निवृत्तिवेतन आदी प्रकार वगैरेंची माहिती त्यातील गुंतवणूक व परताव्यासह अंध्रुटकर यावेळी देतील. घर, सोने या पर्यायांना उपलब्ध अन्य मार्ग कितपत योग्य हेही ते सांगतील. भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंड या गुंतवणूक पर्यायाकडे पाहण्याचा कल, त्यातील परताव्याचे प्रमाण हे सोदाहरणासह कुलकर्णी आपल्या मार्गदर्शनातून सांगतील. म्युच्युअल फंडांचा तौलनिक आढावा घेण्याबरोबर फंड निवडताना लक्ष द्यावयाचे घटक यावरही ते याप्रसंगी भर देतील.

‘लोकसत्ता’च्या मंचावर तज्ज्ञ वक्ते गुंतवणूकदारांना पडणाऱ्या सर्वसामान्य शंकांचे निरसन करण्याचा यावेळी प्रयत्न करतील. उपस्थित वाचक/ गुंतवणूकदारांनाही यावेळी वक्त्यांना त्यांच्या बचतीविषयीच्या शंका प्रश्नामार्फत सोडविता येतील.

या कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य आहे. गुंतवणूक व बचत यांची संज्ञा स्पष्ट करणारा, महागाईचा सामना करत अधिक परतावा देणारा गुंतवणूक पर्याय सुचविणाऱ्या या कार्यक्रमाला मुंबई, ठाणे आणि कल्याण येथे भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता हा उपक्रम नवी मुंबईत होत आहे. गुंतवणूक व बचत यांची संज्ञा या कार्यक्रमातून स्पष्ट होणार आहे.

केव्हा, कुठे?

  • आज ३० जुलै २०१६
  • वेळ : सायं. ६.०० वा.
  • स्थळ : मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर-६, वाशी, नवी मुंबई</li>

तज्ज्ञ मार्गदर्शक :

  • मिलिंद अंध्रुटकर आणि वसंत कुलकर्णी

Mutual fund investments are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing.