येत्या २९ मे आणि ३० मे रोजी रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सच्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ या परिसंवादात दहावी-बारावीनंतरच्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांची आणि करिअर निवडीच्या तंत्रांची सविस्तर ओळख करून देणाऱ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  
या परिसंवादाच्या सुरुवातीच्या सत्रात पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या करिअरविषयक विभागाच्या प्रमुख नीलिमा आपटे ‘करिअर निवडताना..’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर ‘करिअरमधील सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि विकास’ या विषयावर कॉर्पोरेट ट्रेनर गौरी खेर यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि करिअरसंधी’ या विषयावर ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. या परिसंवादासोबतच रवींद्र नाटय़ मंदिर येथे शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आघाडीच्या शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. विविध शिक्षणसंस्थांची माहिती या प्रदर्शनात मांडली जाईल.
२९ मे आणि ३० मे या दोन्ही दिवशी वक्ते आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय सारखाच असेल. या दोन्ही दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी उपस्थित राहण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० रुपये हे प्रवेशशुल्क आकारले जाणार आहे. यात उपस्थितांना दुपारचा लंच बॉक्सही देण्यात येईल. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

कधी?
२९ व ३० मे, सकाळी ९।। ते सायं. ५
(प्रवेश कोणत्याही एका दिवशी)
कुठे?
रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी.

प्रवेशिका येथे उपलब्ध..
* रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी,
* विद्यालंकार हाऊस, प्लॉट क्र. ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व).
* वेळ : स. १० ते सायं. ६.

अधिक माहितीसाठी संपर्क
०२२- ६७४४ ०३ ४७
०२२- ६७४४ ०३ ६९