मंगळवार, ३ मार्चपासून ‘लोकसत्ता’च्या मुख्य अंकात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षांविषयी मार्गदर्शन करणारी ‘स्पर्धा परीक्षा गुरू’ ही दैनंदिन लेखमाला सुरू होत आहे. mpsc
****
ही लेखमाला सुमारे ४५ दिवस सुरू राहणार असून यात एमपीएससी आणि यूपीएससीची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षाविषयक मार्गदर्शनपर लेखांचा समावेश असेल.
****
दररोज एमपीएससी तसेच यूपीएससी स्पर्धापरीक्षेविषयी असणाऱ्या या लेखमालेत परीक्षापद्धती, परीक्षांचा सुधारित अभ्यासक्रम, प्रत्येक घटक-उपघटकांविषयी सविस्तर मार्गदर्शन.
****
अभ्यासाची तयारी कशी
करावी, परीक्षार्थीचा दृष्टिकोन
कसा असावा, सरावासाठी प्रश्नोत्तरे, उपयुक्त संदर्भग्रंथांची यादी अशा अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.