वाचकांची अभिरुची जोपासत सोशल मीडियावरही लोकमान्य लोकशक्ती ठरलेल्या ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजने शुक्रवारी सहा लाख लाईक्सचा टप्पा ओलांडला. ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजने वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘लोकसत्ता’मधील निर्भिड अग्रलेख, विविध लोकप्रिय पुरवण्यामधील बुद्धीला खाद्य पुरविणारे लेख, राज्य पातळीवर गाजणाऱया बातम्या यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात घडणाऱया घडामोडींचे अपडेट्स या फेसबुक पेजच्या माध्यमातून नेटिझन्सपर्यंत पोहोचविले जातात. फेसबुकवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतानाच वाचक वेगवेगळ्या पोस्टंना मोठ्या प्रमाणात शेअरही करतात. सहा लाख लाईक्सचा टप्पा ओलांडणे, ही वाचकांच्या प्रतिसादाची पावतीच म्हणावी लागेल.
फेसबुकसोबतच ‘लोकसत्तालाईव्ह’ (LoksattaLive) या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून विविध घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स ‘लोकसत्ता’कडून नेटिझन्सपर्यंत पोहोचवले जातात. ‘लोकसत्ता’च्या ट्विटर अकाऊंटलाही वाचकांचा वाढता प्रतिसाद असून, फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
‘लोकसत्ता लाईव्ह’ (Loksatta Live) या यूट्यूब चॅनेलवरही दिग्गज व्यक्तिमत्त्वांशी साधलेला संवाद, सेलिब्रिटींच्या मुलाखती, विविध कार्यक्रमांचे लाईव्ह स्ट्रिमिंग प्रेक्षकांना पाहायला मिळते. तुम्हीसुद्धा या चॅनेलला सब्सक्राईब करून हे व्हिडिओ पाहू शकता.
सोशल मीडियावर अल्पावधीत मिळवलेल्या या यशाचे सारे श्रेय वाचकांचेच अर्थात तुमचेच!!!